आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:ऊसतोडणीस जाण्यासाठी नकार; गर्भवतीच्या पोटावर मारल्या लाथा, तीन महिन्यांचे अर्भक दगावले

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेने ऊसतोडणीला जाण्यासाठी नकार दिल्याने संतापलेल्या पतीसह सासूने मारहाण केली. या वेळी सासूने तिच्या पोटात लाथा मारल्याने गर्भवतीच्या पोटातील तीन महिन्यांचे अर्भक दगावल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी तांडा येथे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला. कविता बालाजी पवार (२१) असे पीडित विवाहितेचे नाव आहे.

कविता यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी बालाजी नामदेव पवार यांच्याबरोबर लग्न झाले. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पती बालाजी आणि सासू सुमन यांनी ऊसतोडणीला सोबत चल म्हणून आग्रह धरला. परंतु तीन महिन्यांची गर्भवती असल्याने तिला डॉक्टरांनी ओझे उचलू नका, असा सल्ला दिला होता. त्यामुळे कविताने पतीबरोबर ऊस तोडणीस जाण्यास नकार दिला. आपली पत्नी आपल्याबरोबर उसतोडणीसाठी येत नसल्याचे पाहून बालाजी व सासू सुमन यांनी तिला मारहाण सुरू केली.

यावेळी पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वदना होऊ लागल्या. त्यामुळे कविता एकटीच स्वाराती रुग्णालयात दाखल झाली. तपासणीअंती पोटातील तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, शनिवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी विवाहितेच्या पोटातून मृत बाळ काढून टाकण्यात आले असे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पती आणि सासूवर गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरिक्षक केंद्रे करत असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...