आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:ऊस घेऊन जाण्यास नकार; शेतकऱ्याचे उपोषण सुरूच

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यात आतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. टाकरवण येथील शेतकरी लक्ष्मण गरड यांची तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास नोंद व शेअर्स आहे. तरी देखील ऊसाला तोड येत नसल्याने ऊस शेतात वाळु लागला आहे. त्यामुळे शेतकरी लक्ष्मण गरड हे बुधवार पासुन माजलगाव तहसील कार्यालयासमोर उपोषनास बसले आहेत.

टाकरवण शिवारात यंदा आतिरिक्त उसाचे उत्पादन झाले आहे. ऊसाची कारखान्याकडे नोंद व शेअर्स असले तरी कारखाना ऊस नेण्यास उदासीनता दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. टाकरवन येथील शेतकरी लक्ष्मण गरड यांची छत्रपती सहकारी कारखान्यास २३ जानेवारी २०२१ रोजी एक हेक्टर ऊसाची नोद केलेली आहे. अद्यापही ऊसाला तोड आलेली नाही. गाळप हंगाम संपला तरी शेतात ऊस आहे. ऊसाला कारखान्याने सात दिवसांत तोड द्यावी असे निवेदन त्यांनी दिले होते. मात्र, त्याकडेही कारखान्याने दूर्लक्ष केले आहे. दखल न घेतल्याने लक्ष्मण गरड हे ऊसाच्या बुधवार पासुन माजलगाव तहसिल कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. तिन दिवस ऊलटूनही त्यांची कारखाना प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

दरम्यान, कारखाना प्रशासनाने उपोषणकर्त्या शेतकऱ्याला मालक तोड करुन ऊस कारखान्याला पाठवून देण्यास सांगितले आहे. माऋ, मजूरांची टंचाई आणि मालक तोड शेतकऱ्यांना परवडत नसल्याने कारखान्यानेच ऊस घेऊन जावा अशी मागणी गरड यांनी केली असून त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे उपोषण सुरुच असून तोडगा निघालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...