आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:प्रसाद, भंडारा वाटपासाठी नोंदणी करणे आवश्यक

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि प्रसाद तयार करणारे, वाटप करणारे लोक आणि व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार अन्न सुरक्षा कायद्यानुसार वेबसाइटवर नोंदणी प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक पावले उचलली आहे. बीड जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांतर्फे भंडारा, महाप्रसाद, अन्नदान करण्यात येत आहे. प्रसाद तयार करताना निर्मितीची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ, परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा, तसेच प्रसाद तयार करणाऱ्या केटरर्सची माहिती अद्ययावत ठेवावी, प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे, उरलेल्या शिळ्या अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट लावावी, प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा, गणेश महामंडळाच्या नावाने Mid डे meal option सिलेक्ट केल्यावरच online रजिस्ट्रेशन करता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे
लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी अशा बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...