आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित करा:पवार कुटुंबीयांचे गायरानावरील अतिक्रमण नियमित करा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुलसाठी उपोषण करताना मृत्यू झालेल्या अप्पराव पवार यंाचे वासनवाडी शिवारात गायरानावर केलेल अतिक्रमण नियमित करुन त्या ठिकाणी पवार कुटुंबियांना घर बांधण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे मंत्री पदाचा दर्जा असलेले अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात वास्तव्यास असलेल्या अप्पराव पवार यांना मंजूर घरकूल ते रहात असलेल्या गायरान जमीनीत बांधण्यास विरोध केला जात होता. त्या ठिकाणी परवानगी द्यावी किंवा पर्यायी जागा द्यावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. ४ डिसंेबर रोजी त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत्यू झाला होता. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या मंत्री पदाचा दर्जा असलेल्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी आता या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठव्ून पवार यांचे गायरानावरील अतिक्रमण कायम करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...