आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल टेस्टिंग एजन्सी:फेलोशिपसाठी अर्ज‎ वय मर्यादेत सूट‎‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने युजीसी‎ नेट परीक्षेत ज्युनिअर रिसर्च‎ फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या‎ उमेदवारांना वयोमर्यादेत सुट‎ देण्यात आली आहे. आता ३० वर्ष‎ वयाचे युवक देखील‎ फेलोशिपसाठी अर्ज करु शकतील.‎ यासंदर्भातील एक परिपत्रक‎ एनटीएने नुकतेच जारी केले आहे.‎ यापूर्वी युजीसीद्वारे १ फेब्रुवारी‎ २०२३ पर्यंत निर्धारित केलेली‎ वयोमर्यादाच परीक्षेसाठी गृहित‎ धरण्यात येणार होती.

एनटीएने यात‎ बदल केला आहे. यामुळे परीक्षेला‎ बसणाऱ्या युवकांचे वय आता २‎ डिसेंबर २०२२ पर्यंत ३० वर्ष असणे‎ आवश्यक आहे. तर असिस्टंट‎ प्रोफेसर पदासाठी वयोमर्यादात‎ निश्चित केलेली नाही.‎ एससी, एसटी, ओबीसी,‎ एनसीएल, ट्रान्सजेंड, महिला‎ उमेदवारांना अधिकतम‎ वयोमर्यादेत पाच वर्षांची सुट‎ देण्यात आली आहे. तर एलएलएम‎ पदवी करणाऱ्यांना तीन वर्षांची‎ सवलत देण्यात आली आहे. तसेच‎ सैनिकी सेवेत असणाऱ्यांना देखील‎ पाच वर्षांची सवलत वयोमर्यादेत‎ देण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...