आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळाटाळ:ठेकेदाराकडून कपात रक्कम शेतकऱ्यास देण्यास कारखान्याची टाळाटाळ

बीड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरच्या ठेकेदाराने घेतलेले चाळीस हजार रुपये शेतकऱ्यास परत करावे असे आदेश साखर सहसंचालकांनी देऊनही माजलगाव येथील जयमहेश कारखान्याकडून रक्कम शेतकऱ्यास देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे जयमहेश कारखान्याने या रकमेचा अपहार केल्याचा आरोप शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी केला आहे.शुभम भास्कर माने (रा.वाघोरा ता.माजलगाव) या शेतकर्‍याने हार्वेस्टर ठेकेदाराविरुध्द जयमहेश कारखान्याकडे तक्रार केली होती. याची प्रतिलिपी साखर सहसंचालक व साखर आयुक्तांना दिली होती.

तोडणी ठेकेदाराने माने यांच्या शेतातील ऊसतोडणीसाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. माने यांनी ठेकेदारास मोबाईलवर ऑनलाईन ४० हजार रुपये दिले. यामुळे संबंधीत ठेकेदाराने घेतलेले ४० हजार रुपये देण्याची मागणी शेतकरी शुभम माने यांनी जयमहेश प्रशासनास ३१ मे २०२२ रोजी निवेदनाद्वारे केली होती. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी कारखान्याने शेतकरी माने यांचे ४० हजार रुपये परत केले नसून ठेकेदाराच्या बिलातूनही रक्कम कपात केली नाही.

बातम्या आणखी आहेत...