आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्यपाल कोश्यारींना हटवा; बीडमध्ये काँग्रेसची निदर्शने, प्रचंड घोषणाबाजी

बीड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात आली. तर कोश्यारींचा नेहरु शर्ट बीडमध्ये आणणार्‍यांना एक लाखाचे बक्षिस बीड काँग्रेसच्या वतीने जाहिर करण्यात आले.

संविधानिक पदावर असणारे कोश्यारी हे जाणीवपुर्वक वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल असे अवमानकारक शब्द वापरत आहेत. भारतीय जनता पार्टी सुडाचे राजकारण करून सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी े जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव, तालुकाध्यक्ष रमेश सानप नवनाथ थोटे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, राहुल जाधव, दादासाहेब बनसोडे, परवेज कुरेशी आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...