आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम:रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध;एकविचाराने निर्णय घेऊन एकाच्या हातात सोपवतात सत्ता

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुनर्वसित असलेली रेणापुरी ग्रामपंचायची निवडणूक स्थापनेपासून आजतागायत बिनविरोध झालेली आहे. मागील ४५ वर्षापासून या गावातील नागरिक एक विचाराने निर्णय घेऊन एकाच्या हातात ग्रामपंचायतची सत्ता सोपवतात. हीच परंपरा यावर्षीही कायम ठेवत रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाइकनवरे यांच्या मोतोश्री विमल किसनराव नाइकनवरे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुका म्हटले कि, वर्ष, सहा महिन्यापासूनच गावातील विविध गटातील ग्रामस्थांची मोर्चेबांधणीला सुरुवात होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावात दोन, तीन प्यानल तयार होतात अन निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात होते. गावखेड्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही आता लाखो, करोडो रुपयाची धूळधाण होत असल्याचे अनेकठिकाणी पाहायला मिळते. असे असतानाही माजलगाव तालुक्यातील पुनर्वसित असलेल्या रेणापुरी ग्रामपंचायत स्थापणे पासून निवडणूक होत नाही.

एवढेच नव्हे तर, या गावाने आतापर्यंत राष्ट्रपतीच्या हस्ते स्वीकारलेला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवला आहे. गावात दुतर्फा झाडे, नाली, रसे, पाण्याची व्यवस्था, अशा सर्व सुख सुविधा नागरिकांना मिळत आहेत. स्थापणे पासून सुरु असलेली बिनविरोधची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या गावातून सरपंचपदासाठी केवळ एक अर्ज तर, सात सदस्याच्या जागेसाठीही केवळ सातच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर रेणापुरी प्रमाणेच तालुक्यातील गव्हाणथडी, फुल पिंपळगाव या ग्रामपंचायतच्या निवडणुकाही बिनविरोधच्या मार्गावर आहेत. गव्हाणथडी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाठी केवळ एक अर्ज आला असून सात सदस्यासाठी ८ अर्ज आले आहेत. तालुक्यातील फुल पिंपळगाव ग्रामपंचायतमध्येही एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने या गावाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

बातम्या आणखी आहेत...