आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात देशभरातील शेतकर्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी गेवराई राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार भांडवलदारांचे प्रतिनिधीत्व करत आहे, केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार करणार्या या सरकारने उपभोक्त्या शेतकर्यांचे मोठे नुकसान केलेले आहे. केवळ संख्या बळाच्या जोरावर मंजुर केलेले शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावेत अन्यथा मोदी सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल असे इशारा यावेळी अमरसिंह पंडित यांनी दिला. राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनात वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टिका करुन शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेस,मनसे,दलित पँथर आदी पक्षाचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.
आमदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी एकवटे असुन मोठे आंदोलन सरकारच्या विरोधात सुरु केले आहे. आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने पोलिस बळाचा अतिरेकी वापर केला त्याचा निषेध म्हणुन भारत बंदची हाक सर्वपक्षिय संघटनांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसिल कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करुन शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी धरणे अंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणांवर खरपुस टिका केली. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी तीनही कृषी कायद्यातील शेतकरी विरोधी तरतुदींची माहिती दिली.
यावेळी काँग्रेसचे कडुदास कांबळे, सय्यद सिराज, अंकुश पाचपुते, दलित पँथरचे धम्मपाल कांडेकर, जय भवानीचे संचालक श्रीराम आरगडे, कुमार ढाकणे, अॅड. कल्याण चव्हाण, सभापती बाळासाहेब मस्के, सुभाष महाराज नागरे,युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, गजानन काळे, नविद मशायक यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, जय भवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सभापती बाबुराव जाधव, भरत खरात, परमेश्वर खरात, जयसिंग जाधव, सुभाष मस्के, आप्पासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब माखले, रामेश्वर पवार, गणेश वडघणे, माऊली आबुज, मनोहर पिसाळ, गोरख शिंदे, दत्ता दाभाडे, शाम रुकर, शाम येवले, दत्ता घवाडे, शांतीलाल पिसाळ, जालिंदर पिसाळ, दत्ता पिसाळ,बळीराम खराद, बाबासाहेब आठवले, विष्णू हात्ते, अज्जू सौदागर, भास्कर खरात, हन्नानसेठ, साहेबराव पांढरे, आवेज शरीफ, बब्बु बारुदवाले,मुजीब पठाण, जिजा पंडित, वसीम फरोकी, शेख खाजाभाई, संतोष आंधळे, जगन्नाथ काळे, अमन सुतार, विलास ठाकुर, डॉ. चंद्रशेखर गवळी, यासिन भाई, वचिष्ट शिंदे, अक्षय पवार, भागवत चौधरी, सय्यद एजाज, शाम पाटील, कांता नवपुते, किसन पंडित, संदिप मडके, लहु कानगुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,शेतकरी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी निवेदन स्विकारले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.