आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल‎:शिवगर्जना कार्यक्रमांचा‎ अहवाल देसाईंकडे सुपूर्द‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अकरा तालुक्यात शिव‎ गर्जना अभियानाच्या माध्यमातुन‎ घेण्यात आलेल्या कामाचा अहवाल‎ नुकताच शिवसेना सचिव खासदार‎ अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्द‎ करण्यात आला. या भेटीत लवकरच‎ मी बीडला येणार असल्याचे देसाई‎ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना‎ सांगितले.‎ जिल्ह्यातील अकरा तालुक्यात‎ शिव गर्जना अभियानाच्या निमित्ताने‎ सभा घेवुन लोकांच्या गाटी- भेटी‎ घेण्यात आल्या.

या अभियानास‎ प्रतिसाद मिळाला आहे.‎ शिव गर्जना अभियानाचा अहवाल‎ शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू‎ पाटील, जिल्हाप्रमुख अनिल‎ जगताप, शिवसेना नेते शेख‎ निजाम,सुनिल अनभूले यांनी‎ शिवसेना सचिव खासदार अनिल‎ देसाई यांना दिला. यावेळी खासदार‎ देसाई यांनी शिव गर्जना‎ अभियानांतर्गत जिल्ह्यात केलेल्या‎ कामाचे कौतुक केले. यावेळी देसाई‎ यांनी विविध सामाजिक , राजकीय‎ विषयावर चर्चा केली.‎

बातम्या आणखी आहेत...