आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमावत यांच्या पथकाची कारवाई:कत्तलखान्यात जाणाऱ्या‎ 12 गोवंशांची सुटका‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ तालुक्यातील नेकनूरहून‎ हैदराबादच्या कत्तलखान्यात‎ जाणाऱ्या १२ गोवंशांची सुटका करुन‎ तीन जणांविरोधात युसूफ वडगाव‎ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात‎ आला. केजचे उपविभागीय पोलिस‎ अधिकारी पंकज कुमावत यांच्या‎ पथकाने ही कारवाई केली.‎ नेकनूर येथून हैदराबादच्या‎ कत्तलखान्यात १२ गोवंशीय जनावरे‎ कत्तली साठी घेऊन जात‎ असल्याची माहिती कुमावत यांना‎ मिळाली होती.

त्यांच्या‎ आदेशानुसार, पथकातील‎ बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे,‎ राजू वंजारे यांनी केज-अंबाजोगाई‎ रोडवर युसूफ वडगाव पोलिस ठाणे‎ हद्दीत सापळा लावला. संशयित‎ टेम्पो (एम एच २५, यू ०६६९) तिथे‎ येताच त्यांनी झडती घेतली. या वेळी‎ १२ गोवंशीय जनावरे आढळून‎ आले.‎ चालक जाफर शेख आणि क्लिनर‎ अमोल पावले यांच्याकडे विचारणा‎ केली असता त्यांनी ही जनावरे‎ नेकनूर येथील व्यापारी शौकत शेख‎ यांची असल्याचे सांगून कत्तली‎ साठी हैदराबादला घेऊन जात‎ असल्याचे सांगितले. याप्रकरणी‎ तिघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला.‎

बातम्या आणखी आहेत...