आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्हा पोलिस दलात अखेर रडलेल्या बदल्यांना आयजींच्या वार्षिक तपासणीपूर्वी मुहूर्त लागला. सोमवारी जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक अशा तब्बल ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत आदेश काढले. बदल्यांमध्ये माजलगाव शहरचे पीआय धनंजय फराटे यांची गेवराई ठाण्यात, सायबरचे पीआय शितलकुमार बल्लाळ यांची माजलगाव शहर ठाण्यात, नियंत्रण कक्षातील विश्वास पाटील यांची सायबर ठाण्यात, गेवराईचे रविंद्र पेरगुलवार यांची वाहतूक शाखेत तर, वाहतूकचे लक्ष्मण राख यांची गेवराईत बदली केली गेली.
आष्टीचे सलीम चाऊस यांची संभाजीनगरला, पेठ बीडचे हेमंत कदम यांची आष्टीला, संभाजीनगरचे सुरेश चाटे यांची परळी ग्रामीणला, विनोद घोळवे यांची अंबाजोगाई शहरला, बालक कोळी यांची अंबाजोगाई ग्रामीणला, बाळासाहेब पवार यांची केजला, मनिश पाटील यांची मानव संसाधन विभागात बदली केली गेली.
तर सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांची तलवड्याला, पेठ बीडचे नारायण एकशिंगे यांची चकलांब्याला, चकलांब्याचे भास्कर नवले यांची एटीबीला, वाहतूक शाखेचे कैलास भारती यांची पिंपळनेरला, पिंपळनेरचे बाळासाहेब आघाव यांची आर्थिक गुन्हे शाखेत, युसूफ वडगावचे संदीप दहिफळे यांची सिरसाळ्याला, बीड ग्रामीणचे योगेश उबाळे यांची युसूफ वडगावला, सिरसाळ्याचे प्रदीप एकशिंगे यांची पीआरओपदी, तलवाड्याचे प्रताप नवघरे यांची पाटोद्याला, शिरुरचे रामचंद्र पवार यांची पेठ बीडला, परळी ग्रामीणचे अण्णासाहेब खोडेवाड यांची दिंद्रूडला, माजलगाव ग्रामीणचे निलेश इधाते यांची शिवाजीनगरला, नियुक्तीच्या प्रतिक्षेतील वैभव रणखांब यांची बीड ग्रामीणला, केजचे संतोष मिसळे यांची अंबाजोगाई ग्रामीणला, अंबाजोगाई ग्रामीणचे श्रीनिवास सावंत यांची माजलगाव शहरला, गेवराईचे संदीप काळे यांची शहर वाहतूक शाखेत, शिवाजीनगरचे भारत काळे यांची सायबर ठाण्यात, दिंदूडच्या प्रभा पुंडगे यांची केज पिंक मोबाईल पथकात, माजलगाव शहरचे अविनाश राठोड यांची माजलगाव उपविभाग पिंक पथकात, बीड शहरचे घनश्याम अंतरप यांची बीड उपविभागाच्या पिंक पथकात, गेवराईचे प्रफुल्ल साबळे यांची गेवराईच्या पिंक पथकात, नियंत्रण कक्षातील धरणीधर कोळेकर यांची आष्टीच्या पिंक पथकात, संभाजीनगरचे नारायण गिते यांना मुदतवाढ, अंबाजोगाई शहरच्या पोलिस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे यांची अंबाजोगाई पिंक पथकात, चकलांब्याचे दिगंबर पवार यांची शिवाजीनगरला, सायबरचे संदीप जाधव यांची पेठ बीडला, माजलगाव शहरचे विजय थोटे यांची पेठ बीडला, धारुचे संतोष भालेराव यांची चकलांब्याला, संभाजीनगरचे सी. एच. मंेढके यांची अंबाजोगाई शहर, मिना तुपे यांची संभाजीनगर, विठ्ठल केंद्रे धारुर, श्रीराम खटावकर यांची स्थानिक गुन्हे शाखेत, राहुल लोखंडे यांची रिडर शाखेत, रणजित कासले यांची माजलगाव ग्रामीणला, निशिगंधा खुळे यांची सायबर ठाण्यात, विलास जाधव यांची शहर ठाण्यात, सरस्वती राठोड व राजकुमार मोरे यांना मुदतवाढ दिली गेली आहे.
वार्षिक तपासणीपूर्वी निर्णय जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी येत्या आठवड्यात पार पडणार आहे. या तपासणीची तयारी सुरु आहे. याच जोडीला रखडलेला बदल्यांचा आदेश निर्गमित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.