आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले गंगावाडी येथील वाळू टेंडर शासनाने काढला आहे. मात्र ज्या ठिकाणी गट नंबर दिलेला आहे. ते सोडून गावातील धोबी घाटांवर वाळू टेंडर सुरू केला आहे. शासनाचे कोणतेही नियमानुसार पालन केले नाही. महिलांना याचा त्रास होत आहे. यामुळे आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेत हे वाळू टेंडर रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे.
३१ मे रोजी सकाळी अकरा वाजता गंगावाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा घेण्यात आली आहे. या सभेत वाळू टेंडर रद्द करावे या मागणीसाठी ठराव मंजुर करण्यात आला आहे. यया ग्रामसभेत तलवाडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बाळासाहेब भुवर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, माजी जि.प. सदस्य अॅड. सुरेश हात्ते, प्रा. श्याम कुंड, अॅड. सुरेश पवार, सरपंच भास्कर हाताळले, पांडुरंग थडके, देविदास फलके, बंडू यादव, भाऊसाहेब यादव, दुरेश चिकणे, अभिजित मरकड, चक्रधर चिकणे, रामेश्वर मस्के उपस्थित होते.
आ. लक्ष्मण पवार म्हणाले, कोणतीही वाळूमाफिया ग्रामस्थांना धमकी देत असेल तर माझ्याशी संपर्क करा. शासनाने हे टेंडर रद्द नाही केले तर २ जून रोजी गंगावाडी ग्रामस्थांनी उपोषण ठेवले आहे. त्यात मी येणार आहे.आपण गावकऱ्यांच्या सोबत वाळूबाबत लढाई लढू, असे पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.