आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प:वीरशैव धर्म कल्याणासाठी लघुरुद्राचा संकल्प

माजलगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनात एकादश रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र आदी प्रकारच्या रुद्राला विशेष महत्त्व आहे. यामुळे समस्त मानवी जीवनासह वीरशैव धर्माच्या कल्याणासाठी रुद्राचे पठण व लघुरुद्राचा संकल्प महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन माजलगाव येथील सद्गुरु मिस्कीनस्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांनी केले.

माजलगाव येथील सद्गुरु मिस्कीनस्वामी मठ संस्थान येथे नुकतीच रुद्र शिबिर व लघु रुद्राभिषेक महापूजा कार्यक्रमाची सांगता रजत पालखी महोत्सवाने झाली. या वेळी ते बोलत होते. रजत पालखीत सद्गुरु मिस्किन स्वामींची नागफडीधारी रजत मूर्ती ठेवून मिस्किन स्वामींच्या जयघोषात सवाद्य पालखी मठ संस्थान मार्गे हनुमान मंदिर ते सिंदफणा नदीवर गंगापूजनासाठी नेली. गंगा पूजनानंतर पुन्हा पालखी खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर मार्गे संस्थान मठ येथे दाखल झाली.

महिला, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
माजलगाव येथील संस्थान मठात झालेल्या रुद्र पठण शिबिरात २५ महिलांसह १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरात श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सकाळी व संध्याकाळी रुद्राचे पठण, पूजा पाठ, धर्माचरणाचे पाठ दिले.

दीडशेहून अधिक दांपत्यांचा अभिषेकासाठी सहभाग
रुद्र पठण शिबिराच्या सांगता कार्यक्रमात लघुरुद्रा अभिषेक व महापूजेसाठी सद्गुरु मिस्किन स्वामींच्या संजीवन समाधीस अभिषेक घालण्यात आला. या वेळी बहाद्दरपुरा, उस्माननगर, वाकलेवाडी, रहाटी, पेठ शिवणी, महागाव, पिंगळी, मांडाकळी, धनेगाव, नायगाव, गेवराई, नाळवंडी, बीड, माजलगाव येथील जवळपास दीडशेहून अधिक दाम्पत्याने सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...