आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय छात्र सेना विभागाच्यावतीने १० मे महाराष्ट्र जलसंधारण दिनानिमित्ताने पूर्वसंध्येला जलबचत संवर्धन, मृदसंधारण संवर्धन करण्यासाठी, प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी वृक्ष लागवड करून "जपा" अभियानाची सुरुवात केली. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पत्रकार दिलीप अडसूळ यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले" मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आज प्रथमच मी माझ्या महाविद्यालयात प्रमुख पाहुणा म्हणून आलो .याचा मला सगळ्यात आनंद आहे .पूर्वी या परिसरात खडकाळ जमीन होती. परंतु आज या परिसराचे नंदनवन वृक्ष लागवड करून करण्यात आले आहे. नव्हे याठिकाणी तलाव, वृक्ष लागवड यामुळे हा परिसर ऑक्सिजन मिळण्याचे ठिकाण झाला आहे .लोक या या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येतील. खरोखरच हा परिसर एनसीसी विभागाचे मेजर एस पी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हिरवा गार होत आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले "या परिसरातील वृक्ष लागवड हे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शनाखाली एनसीसी विभाग करत आहे. या खडकरानावर प्रामुख्याने जांभूळबन ,चिंचबन मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे. त्याचबरोबर वड, पिंपळ, लिंब ऑक्सिजन देणारे मोठे मोठे वृक्ष लावण्यात आले आहेत.
याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी प्रामुख्याने ज्यांना मधुमेह आहे अशा नागरिकांनी या परिसरात फिरून याच ठिकाणी मधुमेहावर गुणकारी असणारे जांभळ बना मध्ये जाऊन जांभळ खावेत. जेणेकरून तो व्यक्ती मधुमेहमुक्त हवा ही संकल्पना आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी झाडाखाली बसून अभ्यास करावा विचार मंथन करावे यासाठी त्यांना निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन ही संकल्पना डॉक्टर खुरसाळे यांची आहे. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.