आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइमानदारीने काम केल्यास समाजात प्रतिष्ठा मिळते. आज सेवानिवृत्ती असूनही सकाळीही आसाराम काशीद माझ्याकडे आले होते. जमलेल्या गर्दीवरून त्यांच्या कामाची पावती दिसून येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक तथा समग्र शिक्षा बीडचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आसाराम काशिद यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. त्या प्रसंगी पवार अध्यक्ष पदावरून बोलत होते.
याप्रसंगी वैजीनाथ फुलझळके, अनंत खेडकर, प्रणिता गंगाखेडकर, सविता अर्सुळ,डॉ.दिपाली काशिद , हिरालाल कराड, भगवान सोनवणे, गौतम चोपडे, नारायण नागरे, मोहन काकडे, नवजीवन पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम बहिर, मोतीराम नवले, जालिंदर पैठणे, अशोक मसालेकर आदींची भाषणे केली. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे उप. मुकाअ प्रमोद काळे, महिला बालकल्याणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, उप शिक्षणाधिकारी अजय बाहिर, लेखाधिकारी संजय वायदंडे, गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी, सुनील केंद्रे, श्रीराम टेकाळे, गोपाळघरे, शेख जमीर, लक्ष्मण बेडसकर, बी. के. नांदुरकर, सिद्धेश्वर माटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुसाहेब शिंदे यांनी केले तर आभार नानाभाऊ हजारे यांनी मानले. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, डॉ. विक्रम सारुक यांनीही सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास समग्र शिक्षाचे कर्मचारी, मित्र परिवार, जिल्हा परिषद कर्मचारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कुरेशी रफिक, अविनाश गजरे, परसराम अर्सुल, जयलाल राजपूत, गोविंद कोकणे, गिरीश बिजलवाड, शिवाजी अंडिल, इंजि. बाहेगव्हाणकर आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.