आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मभान प्रशिक्षण शिबिर:अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात शिबिराला प्रतिसाद; मुलींनी आत्मनिर्भर होत अन्यायाविरुद्ध बंड करायला हवे : कविता नेरकर

अंबाजोगाई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींनो आत्मनिर्भर व्हा, अन्यायाविरुद्ध बंड करा. उच्च शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, असे आवाहन अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी शाळा-महाविद्यालयीन युवतींना केले.

अंबाजोगाई येथील योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या आठ दिवसीय तेराव्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी झाले. या वेळी नेरकर बोलत होत्या. व्यासपीठावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, आंतरराष्ट्रीय खो - खो खेळाडू निकिता पवार, सेवा निवृत्त मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर, मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी प्रा. माणिकराव लोमटे, उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कराड, सहसचिव साहेबराव गाठाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ यांची या वेळी उपस्थिती होती.

अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी आयोजित प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या उपस्थित विद्यार्थिनींना विविध प्रश्नांवर संवाद साधला. नेरकर म्हणाल्या, गुड टच, बॅड टच यातील फरक मुलींना ओळखता आला पाहिजे. आपण असुरक्षित आहोत असे वाटल्यास समोरच्या व्यक्तीला प्रखर प्रतिकार केला पाहिजे.त्या क्षणी मोठ्या आवाजात नाही, नको म्हटले पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर मानसिक परिणाम होईल व आजूबाजूला असलेल्या व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा लागतो. मुलींनी विचाराने व अनुभवाने समृद्ध व्हायला हवे. निरोगी आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील उत्तम असले पाहिजे. सकस आहार घ्या. संगत चांगल्या व्यक्तींची ठेवा. चांगली संगत असल्यास वैचारिक पातळी वाढते.

बालविवाहास विरोध करा. ज्याप्रमाणे मुलींसाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात त्याच प्रमाणे मुलांनासुद्धा प्रशिक्षण दिले पाहिजे.असे मत अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. शिबिराचा अध्यक्षीय समारोप करत असतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने महिलांना प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संविधानाचा फार मोठा वाटा आहे. संविधानाची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या व्हायला हवी, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य मिळेल. दर्जा आणि संधीची समानता असायला हवी. यासाठीचा प्रयत्न योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. मी सक्षम आहे, निर्भर आहे, अन्याय सहन करणार नाही, असा संस्कार मुलींमध्ये रुजविण्याचा प्रयत्न शिबिरांमधून केला जात आहे. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे यांनी केले. सूत्रसंचालन एस. एस. देशमुख यांनी केले.

११० खड्डे खोदून वृक्षारोपणासाठी घेतला पुढाकार
एनसीसी छात्र बाजीराव गायकवाड, शुभम कातकडे, रोहन कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, हनुमंत घोळवे व सेवक राहुल घाडगे यांनी ११० खड्डे खोदून वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला.

बातम्या आणखी आहेत...