आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:कनकालेश्वर विद्यालयात आयोजित‎ विज्ञान, गणित मेळाव्याला प्रतिसाद‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कनकालेश्वर‎ विद्यालयात मंगळवारी विज्ञान व गणित प्रदर्शन‎ आयोजित करण्यात आले. यात विद्यालयातील‎ पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.‎ विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि गणित विषयासंदर्भातील‎ काही उपकरणे,खेळणी तसेच प्रयोग, विज्ञानाचे‎ काही मॉडेल्स तयार केली होती.विद्यार्थ्यांनी‎ बनवलेली गणित व विज्ञान विषयाच्या संदर्भातील‎ उपकरणे, मॉडेल्स याचे उत्तम सादरीकरण‎ विद्यार्थ्यांना व उपस्थित प्रेक्षकांना करून दाखविले.‎ स्वतः केलेल्या प्रयोगाबद्दल, उपकरणाबद्दलची‎ सविस्तर माहिती त्यांनी मिळवली होती.

प्रदर्शन‎ पाहण्यासाठी आलेली प्राथमिक व माध्यमिक‎ विद्यालयातील सर्व विद्यार्थी, त्यांच्या सर्व प्रश्न व‎ शंकाचे समाधान या सहभागी विद्यार्थ्यांना करता‎ आले. गुणदानानुसार आरे रितेश व लोंढे साईनाथ‎ यांनी बनवलेल्या पावर बँक या उपकरणाला प्रथम‎ क्रमांक, लष्करे पंकज व शिरसागर रोहित यांनी‎ बनवलेले सौर ऊर्जेचे उपकरण याला दुसरा क्रमांक,‎ तर काळे प्रेम या विद्यार्थ्याने बनवलेले ज्वालामुखीची‎ प्रतिकृती या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला.‎

बातम्या आणखी आहेत...