आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:परळीत श्री रामलिंग चौंडेश्वरी‎ पारायण सोहळ्यास प्रतिसाद‎

परळी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने‎ श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण‎ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.‎ शुक्रवारपासून या कार्यक्रमास प्रारंभ झाला असून‎ या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील‎ भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे.‎ परळीतील गुरूकृपानगर येथील हरेगावकर‎ यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या‎ चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे भव्य‎ आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात‎ सकाळी ७ ते १० या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी‎ देवांग पुराणाचे पारायण करण्यात येत असून‎ पारायण प्रमुख लता येळाये यांच्या‎ मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत‎ आहे.सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हरीपाठ,‎ भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रम होत आहे.‎ या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची‎ मोठी गर्दी होत आहे. सकाळच्या व‎ संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग‎ पुराण पारायण व हरीपाठ,भजन,कीर्तन‎ श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष मोठ्या‎ संख्येने हजेरी लावत आहेत.कार्यक्रम यशस्वी‎ करण्यासाठी परळी कोष्टी समाजातील‎ महिला,पुरूष परिश्रम घेत आहेत

बातम्या आणखी आहेत...