आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठराशे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची निरंजन सेवाभावी संस्थेने स्वीकारली जबाबदारी; नवनियुक्त कार्यकारिणीचा सन्मान

शिरूर कासार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पुण्यासह बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, मुळशी, वेल्हा, शिवनेरी व सर्व गड-किल्ले तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यातील पंधराशे तर बीड जिल्ह्यातील ३०० गोरं गरीब विद्यार्थ्यांचे येणाऱ्या वर्षाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार असल्याचे आज नवनियुक्त कार्यकारिणीचा सन्मान व शपथ सोहळ्यात नवं नियुक्त अध्यक्ष नवनीत मानधनी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

पुणे येथे झालेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. नवनीत मानधनी यांची सर्वनुमतें निवड झाली आहे. तर, सचिवपदी सीए दुर्गेश चांडक यांची नियुक्ती झाली असून पुढील तीन वर्षांसाठी या नव्या कार्यकारिणीची निवड झाली असून संस्थेच्या नारायण पेठेतील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर कलंत्री, महेश सोमाणी, शामसुंदर पोफलिया आदी उपस्थित होते. नव्या आर्थिक वर्षाकरीता उपाध्यक्षपदी सीए विशाल राठी, आनंद कासट यांसह सहसचिव मुकेश माहेश्वरी, खजिनदार स्वप्निल देवळे, जनसंपर्क अधिकारी व नियोजन समिती प्रमुखपदी विशाल सारडा तसेच धीरज धूत, विराज तावरे यांची कार्यकारिणीमध्ये निवड झाली असून ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, संस्थेतर्फे वर्षभरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकरीता विविध समित्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. पुढील काळात गरजू, उपेक्षित व वंचित घटकातील मुलांसह ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी संस्था प्रामुख्याने कार्यरत राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...