आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टी:आष्टी येथे सेवानिवृत्त जवान प्रवीण वारंगुळे यांचे मिरवणुकीने स्वागत

आष्टी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील वारंगुळे वस्ती येथील जवान प्रविण अंबादास वारंगुळे हे आपली केंद्रीय राखीव दलात अखंड सेवा पूर्ण करुण आपल्या जन्मभूमीत परतले. देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आष्टी शहरामधून रंगी बेरंगी फुलांनी सजवलेल्या चार चाकी गाडीमधून ढोल ताशाच्या गजरात ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’ असा नारा देत वारंगुळे यांची उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूकीनंतर नागरिकांच्या वतीने सैनिक अंबदास वारंगुळे यांचा आई रतनबाई, वडिल अंबादास व पत्नी यांच्यासह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हा परिषद सदस्यसतिष शिंदे, सरपंच पोकळे. पी.वाय.काळे.सचिन वारंगुळे, त्रिदल सौनिक संघटनचे जिल्हा अध्यक्ष अंकुश खोटे, सचिव महादेव खेडकर, बबनराव दहिफळे, श्रीराम माने, हनुमान झगडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी वारंगुळे यांनी मनाेगत व्यक्त केले. त्यांनी भारतीय सैन्य दलात सन २००१ मध्ये भरती होत बेसिक ट्रेनिंग, आसाम, दिल्ली, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, राजस्थान यासह विविध ठिकाणी आपली सेवा बजावल्याचे सांगितले. यापुढेही भारतमातेच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी वारंगुळे वस्तीसह आष्टी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

बातम्या आणखी आहेत...