आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:वाळू उपशास विरोध केल्याने सेवानिवृत्त शिक्षकास मारहाण ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातून वाहणाऱ्या ओढ्यातून वाळू उपसा करण्यास विरोध करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र अनंतराव गव्हाणे (६४) यांची शेत सर्वे नं. ७०/३ मध्ये सहा एकर जमीन असून या जमिनीतून ओढा वाहतो.

१८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ वाजता ते शेतात काम करीत असताना गावातील बाळासाहेब तुकाराम गव्हाणे हा ओढ्यातून वाळू उपसा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास विरोध केला असता वाळू घेऊन जाऊ नको असे तू का म्हणतोस असे म्हणत शिवीगाळ करीत बाळासाहेब गव्हाणे याने राजेंद्र गव्हाणे यांना मारहाण केली. वाळू घेऊन जाऊ दिले नाही तर तुला बघून घेतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र गव्हाणे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब गव्हाणे याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...