आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:मुख्याध्यापिका सुभद्रा त्रिंबक खेडकर-सानप यांचा सेवापूर्ती सोहळा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुभद्रा त्रिंबक खेडकर-सानप या नियतवयोमानानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिठी ता.पाटोदा या शाळेतून मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. सदर सेवापुर्ती च्या कार्यक्रमास बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (भाप्रसे) यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनीही शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक, किट्टी आडगाव, खापर पांगरी या शाळेतील सर्व शिक्षक तसेच इतर शाळेतील शिक्षक हे आवर्जून उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...