आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जिन्हा परिषद हायस्कुल शाळेतील सन १९९० - ९१ च्या बॅचचे वर्ग मित्र स्नेहमिलन (गेट टुगेदर ) च्या निमित्ताने एकत्र आले होते. हायस्कुल शाळेत रविवार दिं. ८ मे २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांना शिकविणाऱ्या गुरु जणांना या कार्यकमास येण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यान आले होते त्यामुळे हे सर्व वर्ग मित्र व त्यांना शिकविणारे गुरुजी या कार्यक्रमास हजर राहिल्याने सकाळी १०ते ५ या वेळेत जि.प.हायस्कुल शाळेत १९९०-९१ च्या बॅचच्या विद्यार्थ्याचा ३१ वर्षानंतर पुन्हा वर्ग भरला होता.
हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळें आपल्या वर्ग मित्राची व आपल्या ज्ञानार्जन करणाऱ्या गुरुंजींच्या भेट होईल व त्यांच्या सानिध्यात पुन्हा एक दिवस रमता येईल असा उद्देश शहरात वास्तव्यास असणारे डॉ.रविद्र राजपुरे,ॲड.जब्बार पठाण,बाबासाहेब मुळे,सुहास जाधव आशाताई कोल्हे आदी वर्ग मित्रांनी ठेवुन कार्यकमाची जय्यत तयारी केली होती. अनेक वर्षानी सर्व 'वर्ग मित्र व मैत्रीणी एकत्र येत असल्याने जिल्हा परिषद हायस्कुल शाळेत भव्य मंडप उभारण्यात आला होता. सकाळी १०वा.वर्ग मित्र व त्यांना शिकविणारे शिक्षक जि.प.हायस्कुल मध्ये जमताच ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.सर्व वर्ग मित्र व मैत्रीणी यांचे कौटुंबीक माहीतीचे फॉर्म भरुण घेण्यात आले व कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व वर्ग मित्र व मैत्रीणींनी स्वता:हाची कौटुंबीक,व्यावसायीक किंवा नौकरीचा परिचय करूण दिला.
या मेळाव्यास शिक्षक रामराव डिडुळ ,मरे , गव्हाणे ,बन्सीधर शिंदे ,सर्जेराव राजपुरे ,वाट ,पांचाळ ,दत्तात्रय ढेरे , मोराळे ,खेडकर ,अवढाळ शिक्षक वृंद उपस्थीत होते. या सर्व गुरुजनांचा पोषाख व शाल श्रीफळ, मानपत्र,पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला तसेच दिवंगत गुरुजीना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मित्रांनी आपल्या वर्गात शिक्षण घेत असलेला भागिनींनाही साडी चोळी देऊन ३१ वर्षांनंतरही बंधू प्रेम असल्याचे दाखवुन दिले.
या वेळी रमेश पोकळे, ॲड.सुशील कोठेकर, संतोष डावकर,दत्ता हुंबे,राजेद्र अविळे, माधुरी नाईकनवरे (खेत्रे), उषा काबळे, संगीता पोद्दार (दिक्षीत), आशाताई कोल्हे (घोलप ) आदीनी शाळेतील बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला.यावेळी सतोष वीर,बापुराव मळेकर, शांताराम ढेरे,डॉ. नंदकुमार जाधव, सुधाकर गर्जे,सुरेश नाईकनवरे, भारत दगडे, सोमेश्पर जावळे, सत्यकुमार कदम, शेख आसेफ,श्रीधर राऊत,लक्षीकात देशमुख, शिवाजी घरत यांच्यासह अनेक वर्ग मित्र उपस्थीत होते. यावेळी परशुराम मुळे,बापु दळवी,सतीश शेवाळे व सय्यदआयुब या गरजु वर्ग मित्राना संपुर्ण पोषाख देण्यात आले. अशा प्रकारचे गेट टुगेदर प्रति वर्षी करण्याचे ठरवले हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात वर्ग मैत्रीणींचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम व वर्गमित्राचे एकत्रीत नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.अनेक वर्गमित्रांनी उपस्थीत राहुन वर्गमित्रात ३१ वर्षानंतर आपले वर्गमित्र व गुरुजनांच्या सहवासात दिवसभर रमले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड.सय्यद वहाब व ॲड.जब्बार पठाण यांनी केले़ तर आभार प्रदर्शन रुपाली झांबड (कांकरीया) यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.