आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:रेवकी जि. प. शाळेच्या परिसरामध्ये अतिक्रमण, बीईओंकडे केली तक्रार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील रेवकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बबन भागोजी शिंदे यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार अनिल सौंदलकर यांनी गेवराई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शाळेच्या खिडकीजवळ या व्यक्तीने जनावरांचा गोठा बांधला असून यामुळे विद्यार्थ्यांना खेळती हवा मिळत नाही. जनवारांच्या विष्ठेचा वास वर्गात येतो. अस्वच्छतेमुळे मुले आजारी पडत आहेत. सरपंच व मुख्याध्यापक याकडे दूर्लक्ष करत असून कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा उपोषणाचा इशारा सौंदलकर यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...