आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंबाजोगाईतील गुणवंतांच्या सन्मान सोहळ्यात मोंदीचे प्रतिपादन

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी

अंबाजोगाई पंचक्रोशी ही गुणवंतांची खाण आहे. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यावर त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष व नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे . शेख इन्शा फरहत अमानुल्ला , नौशिन सिराज शेख व श्रेयस सुनिल पवार या विद्यार्थ्यांचा एम बी बी एस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश झाल्याबद्दल तसेच स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील कॉमर्स विषयाचे प्रा. सागर कुलकर्णी यांनी पीएचडी प्राप्त केल्यामुळे व अक्षता दत्ता देवकते हिने नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर जम्पिंग रोप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यामुळे तसेच संजय भिसे , जावेद पप्पूवाले व श्री शोयब गवळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

गुणिजनांच्या सत्कार प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहराचा नावलौकिक करणाऱ्या विविध क्षेत्रातील गुणवंत आणि प्रतिभावंतांचा वेळोवेळी यथोचित सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम केले आहे . व त्यामुळे अशा सन्मानाने गुणिजनांना पुढे काम करण्यासाठी उभारी मिळून त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होते अशी भावना राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली . त्यांना यापुढेही अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँक व राजकिशोर मित्र मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतो.

असे सत्कार समारंभ यापुढेही आपण वारंवार आयोजित करतच राहू असे अभिवचन सर्व गुणिजनांना राजकिशोर मोदी यांनी दिले. तसेच सर्व गुणवंतांनी यापुढेही चांगल्या पद्धतीचे कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी राजकिशोर मोदी यांच्या हस्ते सर्व प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. सागर कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्याकडून जो सन्मान झाला आहे तो आम्हाला यापुढे कार्य करण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त करत बँकेतर्फे आमच्या पाठीवर जी कौतुकाची थाप टाकली त्याबद्दल बँकेचे व राजकिशोर मोदी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी एमबीबीएस साठी प्रवेश मिळालेली विद्यार्थिनी कुमारी नवशिन सिराज शेख हीने पण आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करत केलेल्या कौतुकबद्दल राजकिशोर मोदी यांचे आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...