आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी, तलाठ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक गावात त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला असून लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहन केज तहसील कार्यालयातील संबधित विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांनी केले आहे.
केज येथील तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र, बँकेचे पास बुक व आधार कार्ड तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांसाठी मुलांचे आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संबधित कागदपत्रे दाखल करण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्ध लाभार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन आता गावात मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत लाभार्थ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
त्यानुसार संबधित सज्जाचे मंडळ अधिकारी व तलाठी हे पुढे दिलेल्या तारखेस गावात उपस्थित राहणार असून ६ फेब्रुवारी रोजी काळेगाव घाट, नाव्होली, बेलगाव, केळगाव, दैठणा, राजेगाव, ७ फेब्रुवारी रोजी बोरगाव, वरपगाव, भोपला, कापरेवाडी, ८ फेब्रुवारी रोजी कोरेगाव, मस्साजोग, जाधवजवळा, शिरपुरा. ९ फेब्रुवारी रोजी साळेगाव, मांगवडगाव, बोबडेवाडी, लाखा. १० फेब्रुवारी रोजी माळेगाव, गोटेगाव, सोनेसांगवी - १ व २, मोटेगाव, गांजी, सुकळी. १३ फेब्रुवारी रोजी सारणी ( सां. ), एकुरका, सांगवी, माळेवाडी,धोत्रा. १४ फेब्रुवारी रोजी चंदनसावरगाव, होळ, बनकारंजा. १५ फेब्रुवारी रोजी उंदरी, आडस, केकतसारणी, केकानवाडी. १६ फेब्रुवारी रोजी चिंचोली माळी, हादगाव, टाकळी, सारुकवाडी, डोका, सातेफळ, कदमवाडी, डोणगाव. १७ फेब्रुवारी रोजी सोनीजवळा, आनंदगाव, पाथरा, सारणी (आं.). २०फेब्रुवारी रोजी जवळबन, सावळेश्वर, पैठण, भाटूंबा. २१ फेब्रुवारी रोजी युसूफवडगाव, धनेगाव, सादोळा, भालगाव, बावची, आनेगाव. २२ फेब्रुवारी बनसारोळा, सौंदाना, आवसगाव, कौडगाव, इस्थळ, नायगाव, वाकडी. २३ फेब्रुवारी बोरीसावरगाव, लाडेगाव, औरंगपूर, कानडीबदन, दिपेवडगाव, पळसखेडा. २४ फेब्रुवारी रोजी लाडेवडगाव, कळंबअंबा, मानेवाडी. २७ फेब्रुवारी लव्हुरी, येवता, जिवाचीवाडी, नागझरी या गावात हजर राहतील.
नागरिकांची सोय महत्वाची हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी विविध योजनेच्या लाभार्थ्यांची धावपळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने गावात अधिकारी प्राधिकृत करून कागदपत्रे संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे संबंधितांनी आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे.’- आशा वाघ, नायब तहसीलदार, केज.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.