आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्रीभ्रूण हत्या रोखणे जनजागृती अभियानांतर्गत बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्यास तक्रार नोंदवावी. याबाबतची माहिती देणाऱ्यास शासनाकडून खबऱ्या बक्षीस योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. हे बक्षीस कोर्टात केस दाखल झाल्यावर देण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. जिल्हा बीड संपर्कासाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२३३४४७५ तर, www.amchimulgi.com या संकेतस्थळावर माहिती देण्याची व्यवस्था केलेली आहे. गर्भपातासाठी नवीन कायदा म्हणजेच एमटीपी कायदा अस्तित्वात आला आणि यात गर्भधारणा झाल्यावर २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करायला कायदेशीर परवानगी दिली.
या परवानगीची अट होती की, बाळाच्या जन्मामुळे आईला शारीरिक किंवा मानसिक हानी झाल्यास आणि जन्माला येणाऱ्या बाळामध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग येण्याची शक्यता असल्यास, गर्भाच्या आयुष्याच्या निर्णयासाठी आई आणि वडील मत आणि सहमती देऊ शकतात. मात्र, शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार डॉक्टरांचा असतो. आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताचा निर्णय एक नोंदणीकृत डॉक्टर घेऊ शकतात. १२ ते २० आठवड्यांपर्यंत विकसित झालेल्या गर्भाचा निर्णय घेण्यासाठी दोन नोंदणीकृत डाॅक्टरांचे मत विचारात घेणे अनिवार्य असते, असे जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांनी सांगितले.
हिवरे बाजारचा आदर्श घेऊन प्रयत्न करावेत स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न मोठा असताना हिवरेबाजार या गावाने लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. दुसरीही मुलगी झाल्यास तिच्या विवाहाचा खर्च ग्रामनिधीतून करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. तसेच मुलगी सज्ञान झाल्यानंतर म्हणजे अठरा वर्षांची झाल्यानंतर त्या रकमेचे व्याज व रक्कम तिच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षीचा राज्यातील मुलींचा जन्मदर एक हजार मागे ८७५ तर हिवरेबाजारचा जन्मदर १४२८ असा आहे. मुलींच्या योग्य शिक्षणासाठी आणि संरक्षणासाठी केंद्राने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान सुरू केले आहे. - डॉ. सुरेश साबळे , जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
असे आहेत सोनोग्राफी सेंटर्ससाठी नियम गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यापूर्वी तिचे या प्रक्रियेबाबत समुपदेशन करावे. तिला समजेल अशा तिच्या मातृभाषेतील सही घेणे व ती गर्भलिंगनिदान करून घेण्यास आलेली नसून ती तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी सोनोग्राफी करत असल्याचे विहित नमुन्यातील संमतीपत्र घ्यावे. हे संमतीपत्र तिला समजेल अशा तिच्या मातृभाषेत असणे बंधनकारक आहे. त्याची एक प्रत संबंधित गर्भवती महिलेस देणे कायद्याने बंधनकारक आहे. गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांनी मी गर्भाचे लिंग संबंधित महिलेस सांगणार नाही, असे वचनपत्र तारीख व वेळ अचूक टाकून भरावयाचे आहे. सोनोग्राफी केंद्रावर "येथे गर्भलिंगनिदान केले जात नाही'' असा बोर्ड लावणे बंधनकारक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.