आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेराफेरी:हैदराबादहून गुजरातच्या काळ्याबाजारात जाणारा सव्वासात लाखांचा तांदूळ जप्त

माजलगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद येथील बालानगर येथून एका ट्रकमध्ये रेशनचा ७ लाख ३४ हजार रुपये किमतीचा २९ हजार ३८० किलो तांदूळ भरून तो गुजरातच्या काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी नेत असताना माजलगाव शहराजवळील तालखेड फाट्यावर सोमवारी दुपारी जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रकसह एकूण ४५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल आहे. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील इब्राहिमपूर येथील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील बालानगर येथून १४ टायरच्या ट्रकमध्ये (एमएच २१, बीजी २२१८) रेशनचा ७ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २९हजार ३८० किलो तांदूळ भरण्यात आला होता. तो गुजरात राज्यात नेण्यात येत होता.

जप्त २९ हजार ३८० किलो तांदळाची किंमत ७ लाख ३४ हजार रुपये आराेपींनी गुजरातला तांदूळ जात असल्याची दिली कबुली हा ट्रक हैदराबाद येथे तांदळाने भरून गुजरातच्या काळ्याबाजारात जात असल्याची कबुली पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अतिशकुमार देशमुख यांच्या तक्रारीवरून जयश मुकुंद पगारे (२१), विकास संजय हिवराळे ( २३, रा. इब्राहिमपूर, ता. भोकरदन, जि.जालना) यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वर्षांत चार वेळा तांदूळ जप्त १ २५ डिसेंंबर २०२१ : माजलगाव ग्रामीण पोलिसांनी परभणी टी पाॅइंटवरून लातूरकडे ट्रकने जाणारा ३ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ४८२ कट्टे तांदूळ जप्त केला.

२ १२ फेब्रुवारी २०२२: अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने माजलगाव शहराजवळील ब्रह्म गाव येथे ५५८ गोण्या तांदूळ जप्त केला होता. यात ३१ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल होता.

३ १५ जून २०२२ : अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने दोन ट्रकमधून माजलगावच्या परभणी फाट्यावर ३० लाख रुपयांचा गहू व तांदूळ जप्त केला होता.

४ ८ नोव्हेंबर २०२२ : हैदराबादहून ट्रकमध्ये रेशनचा ७ लाख ३४ हजार रुपये किमतीचा २९ हजार ३८० किलो तांदूळ भरून गुजरातच्या काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी नेत असताना तालखेड फाट्यावर जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...