आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने १९७८ मध्ये अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना केली. नंतर पुढे १९९२ मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कायद्याअंतर्गत कायदा म्हणून मंजूर करण्यात आला. या कायद्यामुळेच अल्पसंख्यांकांना जगण्याचे अधिकार मिळाले, असे प्रतिपादन खोलेश्वर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. उमाकांत कुलकर्णी यांनी केले. खोलेश्वर महाविद्यालयात समाजशास्त्रे मंडळाच्या वतीने आयोजित अल्पसंख्यांक हक्क दिवस या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिगंबर मुडेगांवकर हे उपस्थित होते. डॉ.कुलकर्णी म्हणाले, जगभरातील अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेत धर्म आणि भाषा हा अल्पसंख्यांक असण्याचा आधार मानण्यात आला आहे.
म्हणून भारतीय संविधान हे सर्वात मोठे आहे. अल्पसंख्यांकांसाठी शासन नेहमी विविध योजना आखत असते. राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० अन्वये अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी तसेच शैक्षणिक हक्कांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे त्यांनी इतरही अनेक कलमांची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय समारोप डॉ. मुडेगांवकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल खोडेवाड यांनी केले तर आभार प्रा. डॉ. दीपक फुलारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.