आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलही:हक्काचा पीटीआर दिला‎ आता घरकुलही देणार‎

गेवराई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनेक‎ गरीबांना हक्काचे घर मिळाले‎ आहेत तर शासकीय जमीनीवर सन‎ २०११ पुर्वी अतिक्रमण केलेल्या‎ अतिक्रमण धारकांना सुध्दा घर‎ मिळाले पाहिजे म्हणून तत्कालीन‎ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन‎ २०१८ ला अतिक्रमण धारकांना‎ पंतप्रधान आवास योजनेचा लाभ‎ मिळावा म्हणून अतिक्रमण‎ नियामाकुल करण्यासाठी‎ प्रशासकीय समीती नेमण्यात होती.‎ त्या समितीच्या माध्यमातून गेवराई‎ शहरातील अतिक्रमण धारकांना‎ पीटीआरचे वाटप करण्यात आले‎ आहे. आता त्यांना घरकुल मिळवुन‎ देणार असल्याचा विश्वास आ.‎ लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला.‎

शहरातील संघममित्रनगर संतोष‎ नगर, साठेनगर, येथे आमदार‎ लक्ष्मण पवार यांच्या हस्ते‎ अतिक्रमण धारकांना पीटीआर‎ वाटप कार्यक्रम झाला. यावेळी‎ तहसीलदार सचिन खाडे, जे डी‎ शहा, माजी नगराध्यक्ष ब्रम्हादेव‎ धुरधरे,माजी पं. स. सदस्य शाम‎ कुंड, माजी उपनगराध्यक्ष मधुकर‎ वादे, माजी नगरसेवक आप्पासाहेब‎ कानगुडे,संजय आंंधाळे, मधुकर‎ तौर, सुभाष सुतार,आयुब‎ शेख,अरुण मस्के, किशोर‎ धोंंडलकर, राम पवार, बद्दोदीन,‎ रामभाऊ सुतार, गोपाल चव्हाण‎ आदी उपस्थित होते. संघमित्रनगर‎ संतोष नगर, साठेनगर येथील‎ नागरिकांनी आमदार लक्ष्मण पवार‎ यांचे व आभार मानले. कार्यक्रम‎ यशस्वी करण्यासाठी रजीत‎ खाजेकर, राणा कानगुडे, पप्पू‎ काबळे, रजीत डरफे, मुन्ना मोटे,‎ विठ्ठल धापसे आदीनी परिश्रम‎ घेतले.‎ आ. लक्ष्मण पवार यांच्या हस्ते पीटीआरचे वाटप करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...