आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऐन रमजानच्या महिन्यात दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका ; युद्ध, इंधन दरवाढीमुळे पेंडखजूरचे दर 20% वर

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युद्धजन्य स्थितीचा जागतिक बाजारपेठेवर झालेला परिणाम आणि भारतात होत असलेली इंधन दरवाढ यामुळे ऐन रमजानच्या महिन्यातच पेंडखजूरचे दर गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांमधून पेंडखजूरला मोठी मागणी असते आणि याच काळात दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला काहीशी झळ बसणार आहे.

रविवारपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली. कडक उन्हाळ्यातच यंदा रमजानचा महिना आला आहे. उन्हाचा पारा मार्च अखेरीसच चाळिशी पार गेला आहे. अशात रविवारपासून सुरू झालेले रमजानचे रोजे मुस्लिम बांधवांची परीक्षा पाहणारे ठरणार आहेत. रमजानचा उपवास सोडण्यासाठी पेंडखूरचे मुस्लिम बांधवांमध्ये विशेष महत्त्व आहे. पेंडखजूर खाऊनच रोजा सोडला जातो. यामुळे रमजानच्या महिन्यात पेंडखजूरला मोठी मागणी असते. जिल्ह्यात इराण, इराक, सौदी अरेबिया, दुबई या देशांतून पेंडखजूर येते.

मुंबईच्या बाजारपेठेतून ही खजूर जिल्ह्यात दाखल होत असते. दरम्यान, रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचे वेगवेगळे परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाले आहेत शिवाय, भारतात मागील काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही शंभरी पार गेले आहे. यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत पेंडखजूरच्या दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेंडखजूरचा गोडवा काहीसा महाग झाला आहे.

महागड्या अंबर, अजवालाही मागणी
खजूरमध्येही विविध प्रकार आहेत. अंबर, अजवा या खजूर महागड्या म्हणून ओळखल्या जातात. महाग असल्या तरी या खजूरला मागणी अधिक असते. याशिवाय, पलमी, किमीया, कबकब, हार्मोनी, खलमी, रुतब, आफरिन, इलीन अशा विविध प्रकारच्या विविध दरांमध्ये खजूर बीडच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल
गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची भाववाढ खजूरमध्ये झाली असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. महिनाभर खजूरला मागणी असते. व्यापाऱ्यांनी मुंबई मार्केटमधून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून ठेवला आहे.
- सादिक कादरी, व्यापारी, बीड.

बातम्या आणखी आहेत...