आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई:साई मंदिर परिसरातील रस्ता सुशोभीकरण होणार; शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू : मोदी

अंबाजोगाई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरात विकास कामे करत असल्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. जनतेच्या आशीर्वादानेच व त्यांच्याच पाठबळाने आज पर्यंत नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासाची कामे केली. यापुढे अंबाजोगाईतील जनतेशी एक रूप होऊन विकास कामे करण्यात आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ प्रभागातील व साईबाबा मंदिर परिसरातील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ मंगळवारी (ता.८ मार्च) माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मोदी बोलत होते. या कार्यक्रमास प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा ,ज्येष्ठ नागरिक हरिश्चंद्र वर्मा, माजी नगरसेवक नंदकिशोर वैष्णव, बालाप्रसाद सोमाणी, विष्णुदास सोमाणी, जीवन लखेरा, उमाकांत शेटे, ब्रिजलाल सोमाणी, राजकुमार लखेरा, रतनलाल लखेरा, गोविंद तापडे, राजपाल सारडा, मुन्ना सोमणी, नंदकुमार शेटे, अनंत रांजणकर, राजू दरक, माजी नगरसेवक अमोल लोमटे, सुनिल व्यवहारे, धम्मा सरवदे, सुनिल वाघाळकर, राणा चव्हाण, गणेश मसने, बालाप्रसाद वैष्णव, नीलेश डिडवानी, विजय तिवारी, सुरेश पंचभाई, नितीन लखेरा, गजानन शेटे, नारायण लखेरा, सनी लखेरा, बद्रीनारायण वर्मा, चंद्रकांत महामुनी, शेख वसीम यांच्यासह मंगळवार पेठ परिसरातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होती. दरम्यान, यावेळी परिसरातील नागरिकांनी शहरातील विविध समस्यांवरही चर्चा केली. या समस्याही निवारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...