आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी‎ नगरोत्थान अभियान:मित्रनगर भागात रस्ता‎ कामाचे झाले उद्घाटन‎

बीड‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी‎ नगरोत्थान अभियानांतर्गत बीड‎ शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील‎ मित्र नगर भागातील मित्र नगर पाटी‎ ते श्याम सुरवसे यांच्या‎ निवासस्थानापर्यंत सिमेंट रस्ता व‎ नालीकरण कामाचे उद्घाटन‎ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या‎ हस्ते करण्यात आले.‎ माजी आमदार सय्यद सलीम,‎ वैजनाथ तांदळे, झुंजार धांडे,‎ गंगाधर काळकुटे, डॉ.संजय तांदळे,‎ राहुल दुसाने, सुदाम कोळेकर,‎ भोकरे बाळासाहेब, निकम‎ निलंगेकर, ढाकणे टाकळकर‎ आगवान प्रा.ढाकणे यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना‎ आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले‎ की, बीड शहर आणि‎ मतदारसंघातील कोटी रुपयांचे‎ विकास करणे चालू असून शासन‎ दरबारी केलेल्या पाठपुराव्यास‎ फलित येत असून याचा सार्थ‎ अभिमान वाटतो. शहरातील सर्व‎ प्रलंबित विकासकामे आपण मार्गी‎ लावणार आहोत. त्यामुळे‎ नागरिकांनी निश्चिंत राहावे. सर्व‎ कामे ही दर्जेदार होणार असल्याचेही‎ क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी‎ मित्र नगर भागातील नागरिकांच्या‎ वतीने आमदार संदीप क्षीरसागर‎ यांचा सत्कार करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...