आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोकडेश्वर जन्मोत्सवात यंदा ‘चांदणे शिंपित जा...’; कोविडमुक्तीनंतर चैत्र पौर्णिमेला पारंपरिक उत्सव, तीन अंकी नाटक होणार सादर

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट निवळल्यानंतर आता परंपरेप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेला चकलांबा येथे श्री रोकडेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय तीन दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सवानिमित्त यंदा प्रथेप्रमाणे १६ एप्रिल रोजी पौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध लेखक मधुसूदन कालेलकर लिखित ‘चांदणे शिंपित जा’ हे तीन अंकी सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे. श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाच्या नाटक सादरीकरणाला मोठी परंपरा आहे. यंदा ‘चांदणे शिंपित जा’ हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन संतोष पारगावकर हे करतील. यासह संगीत प्रा.सतिश सुलाखे व प्रशांत सुलाखे, सुरश्री सुलाखे (सराफ) हे देतील. सुत्रधार धनंजय सुलाखे हे असणार आहेत. यासह पंचपदी गायन सुधाकर सुलाखे, कालिदास चोपडे, राजेंद्र मुळे, रमाकांत देशपांडे हे करणार आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उदय सुलाखे हे करणार आहेत. प्रसिध्दी प्रमुख म्हणून प्रशांत सुलाखे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह मयूर कुलकर्णी, ऋतूजा सर्वज्ञ, दर्शन नाईक, सानिका देशमुख, मंजुश्री जोशी, किशोर खेडकर, ऋषिकेश सुलाखे, कृष्णा देशमुख, प्रतिक्षा कुलकर्णी, एस.के.देशमुख, डॉ.विजय सुलाखे, संदीप पारगावकर, सुभाष चोपडे हे नाटिकेत विविध वेशभूषा साकारणार आहेत.

या उत्सवाच्या यशस्वितेसाठी रोकडेश्वर उत्सव समिती व ग्रामस्थ, चकलांबा हे नियोजन करणार आहेत. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाने केले आहे. दरम्यान, प्रथेप्रमाणे यंदा रोकडेश्वराला कावड गंगाजल अभिषेकही करण्यात येणार आहे. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता गावातून पालखी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासह मिरवणूकीनंतर शेवटी (कावड) गंगाजल अभिषेक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...