आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:रोटरीचे मोफत डायलिसिस सेंटर गरजू रुग्णांसाठी आधार ठरेल ; डॉ. महेश कोटबागी यांचे प्रतिपादन

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. रोटरी क्लब ऑफ बीड व इतर सहयोगी क्लबच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर सुरू केले जात आहे. या माध्यमातून खऱ्या गरजवंत रुग्णांसाठी आधार ठरेल. तसेच या डायलिसिस सेंटरच्या क्षमतेमध्ये वाढीसाठीही प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन रोटरीचे आरआयडी डॉ.महेश कोटबागी यांनी केले.

बीड शहरातील नगर रोडवरील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. कोटबागी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, डीजी रुक्मेश जखोटिया, पीडीजी हरीष मोटवाणी, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.संतोष शिंदे, रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, मोईन शेख, सतीश शिंगटे, प्रा. सुनील जोशी, वाय. जनार्दन राव, क्षितिज झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. सुनील जोशी यांनी केले.

यावेळी सीईओ अजित पवार म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. आजचा हा प्रोजेक्ट आरोग्य क्षेत्रातील अतिशय चांगला उपक्रम आहे. भविष्यात रोटरीसोबत मिळून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्यास आम्ही तयार आहोत. लागेल तो निधी त्यासाठी उपलब्ध करून, देऊ असे आश्वासन पवार यांनी दिले. डीजी रुक्मेश जखोटिया यांनीही मार्गदर्शन केले.डॉ.महेश कोटबागी म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून आजवर लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. शासन आणि एनजीओ यांनी मिळून केलेले काम निश्‍चितच दीर्घकाळ टीकणारे असल्याचेही डॉ.कोटबागी म्हणाले. त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन रोहिणी पाठक, विकास उमापूरकर, राजेश मुनोत यांनी केले. नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...