आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ४ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सप्टेंबरअखेर सर्व फेऱ्या पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया समाप्त करण्याच्या सूचना आहेत. मात्र, अर्ज भरण्याची मुदत उलटून १६ दिवस झाले तरी अद्याप शिक्षण विभागाने प्रवेशासाठी सोडत काढलेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी प्रतीक्षेत असून आरटीईची सोडत काढण्याची मागणी शिक्षण हक्क कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई कोट्यातून २५ टक्के जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज १० मार्चपर्यंत मागवले होते. जिल्ह्यात ४९५२ पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील मान्यता असलेल्या शाळांपैकी २२७ शाळांमध्ये आरटीई कोट्यातून २५ टक्के प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. यात १९०८ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मर्यादा निश्चिती केली. १० मार्चपर्यंत ४९५२ पालकांकडून त्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सोडत अजून निश्चित नसल्याने या पालकांचे लक्ष आता लॉटरी सोडतीवर लागले आहे. या प्रक्रियेत यापूर्वी इतका उशीर कधीही झाला नव्हता. या
त शिक्षण विभागाकडून सप्टेंबरअखेर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सप्टेंबरनंतर जागा रिक्त असल्या तरी ही प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येईल, असे कळवले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडूनच अशा प्रकारे प्रक्रियेला उशीर होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकर सोडत घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी मनोज जाधव यांनी शिक्षण संचालकांना निवेदनाद्वारे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.