आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:रग्बी फुटबॉल स्पर्धा; राष्ट्रीय सराव‎ शिबिरात बीडच्या 4 जणांची निवड‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ वर्षाखालील मुले व मुलींच्या‎ राज्यस्तरीय रग्बी फुटबॉलच्या स्पर्धा रग्बी ‎असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ‎नेरूळ (रायगड) येथे अायाेजित स्पर्धेत‎ बीड जिल्हा रग्बी फुटबॉल संघास‎ राज्यस्तरीय सुवर्ण पदक मिळाले. राष्ट्रीय‎ सराव शिबिरासाठी चार जणांची निवड करण्यात अाली अाहे.‎ या संघात आदित्य तांदळे, जय वर्धन ‎ ‎ तीपाले, राम राजे शेळके, रोहित भोसले,‎ चैतन्य काळे, सौरभ बागल, समर्थ डुबे,‎ सम्यक शिंदे, निशांत शेळके, प्रेम मस्के,‎ अमर डोके, आर्यन येळवे , खेळाडूंचा‎ समावेश करण्यात आलेला होता.

या‎ संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक शोएब‎ खाटीक आणि अशोक चौरे यांनी मार्गदर्शन‎ केले. खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त करून‎ इतिहास रचला आहे. संघाच्या याच‎ कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाच्या‎ निवडीसाठी जिल्ह्याचे आदित्य तांदळे,‎ सम्यक शिंदे,जयवर्धन तिपाले आणि अमर‎ डाके हे सराव शिबिरास पात्र झाले आहेत.‎ हे प्रशिक्षण शिबिर १६ ते २० डिसेंबर‎ दरम्यान नंदुरबार येथे होत आहे. राष्ट्रीय‎ स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे २१ व २२‎ डिसेंबर रोजी होणार आहे.

निवडीबद्दल‎ जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष इसाक‎ शेख, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव‎ महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप,‎ कार्याध्यक्ष नितीन येळवे, सचिव अशोक‎ चौरे यांच्यासह क्रीडाप्रेमी भगवान‎ बागलाने, सतीश उबाळे,अप्पासाहेब शिंदे,‎ शिवराज देवगुडे, प्रशांत मुळे, कृष्णा‎ काकडे, आदनान शेख, रग्बीचे राष्ट्रीय‎ खेळाडू यश जाधव, संदीप वाघमारे,‎ ऋषभ शिंदे, योगेश कनोजिया राज्य‎ खेळाडू सूरज येवले, पृथ्वीराज औटे,‎ अनिकेत नागरे, वेदांत डावकर, संकेत‎ जगताप, सुयश ताकिक, ईश्वर कानडे,‎ विशाल ढास,मुंडे सुमित, पवार सार्थक‎ यांनी खेळाडूंचे स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...