आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:रासायनिक खतांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये; शेतकऱ्यांना तक्रारींसाठी आता टाेल फ्री क्रमांक

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खते उपलब्ध नाहीत, अशा स्वरूपाच्या अफवांवर शेतकरी बांधवांनी विश्वास ठेऊ नये. रासायनिक खते खरेदी करताना काही तक्रार असेल तर स्थानिक पंचायत समिती, तालुका कृषि कार्यालय यांच्याकडे ती रीतसर नोंदवावी. शेतकरी बांधव यांच्या तक्रारीसाठी राज्यात १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक आहे. तक्रार नोंदविण्यासाठी जिल्ह्याकरिता ९४०३३०८६०८ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी दिली. जेजुरकर म्हणाले, रासायनिक खते खरेदी करताना ती अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून पॉस मशीनवरून व खरेदीच्या पक्क्या पावतीसह खरेदी करावीत.

आपल्या भागात कोणत्या किरकोळ विक्रेत्यांकडे कोणत्या प्रकारचे किती खत आहे, हे beedfertilizer.blogspot.com या blog मधून जाणून घ्यावे.जेजुरकर म्हणाले, बीड जिल्ह्यात खरीप २०२१ मध्ये विविध रासायनिक खतांचा मिळून १ लाख ७३ हजार ८६२ मे. टन वापर झाला होता. त्या तुलनेत खरीप २०२२ या हंगामासाठी राज्य स्तरावरून बीड जिल्ह्यात रासायनिक खताचे १ लक्ष ७७ हजार ६३० मे. टन आवंटन दिले असून गत वर्षीच्या वापरापेक्षा यावर्षी युरिया मध्ये ३०८० मे टन, डीएपी मध्ये ९०९७ मे. टन, सिंगल सुपर फास्फेट मध्ये ८३१ मे टन, म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये ११९० मे. टन असे वाढीव प्रमाणात आवंटन प्राप्त झाले आहे.

विविध संयुक्त एपीके खतामध्ये ८०३५० मे. टन असे आवंटन आहे. त्यामुळे रासायनिक खते उपलब्ध नाहीत, अशा स्वरूपाच्या अफवांवर शेतकरी बांधवांनी विश्वास ठेऊ नये, असे स्पष्ट करून बी. के. जेजुरकर म्हणाले, आवंटनाशिवायप पीडीएम पोटॅश देखील बाजारात उपलब्ध आहे. म्युरेट ऑफ पोटॅश साठी हा एक पर्याय आहे. बाजारात सिंगल सुपर फॉस्फेटची कमतरता नाही. युरिया उपलब्ध आहे. याशिवाय युरियाचा उद्दिष्टांनुसार पर्याप्त बफर साठा शासन यंत्रणेने केलेला आहे. जिल्हा परिषद यंत्रणा पुरवठा नियंत्रण करत आहे.

जेजुरकर म्हणाले, आमचा शेतकरी मिश्र खत उत्पादक असून, घरच्या घरी मिश्र खत तयार करण्याचे मार्गदर्शन कृषि सहाय्यक यांच्याकडून अगदी फोनवरही घेता येईल. त्यामुळे जगाचे अन्न तयार करणारा आमचा शेतकरी हा घरच्या घरी मिश्र खत तयार करणारा उत्पादक असून एवढी त्यांची क्षमता आहे. तेव्हा विशिष्ट खतांच्या ग्रेडचा आग्रह शेतकरी बांधवांनी धरु नये. तसेच खताच्या एखाद्या ग्रेडसाठी विशिष्ट कंपन्यांच्या खतांचा आग्रह धरू नये, असे ते म्हणाले.

राज्य कृषी विभागाचे यंत्रणेने गावोगावी अशी मिश्र खते तयार करण्याची प्रात्यक्षिके घेतली आहेत. एखादे एपीके ग्रेड चे खत त्वरित उपलब्ध नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पीडीएम वा म्युरेट ऑफ पोटॅश अशी तीन सरळ खते उपलब्ध असली तर त्यापासून जगातील कोणत्याही ग्रेडचे एपीके खत घरच्या घरी तयार करता येऊ शकते. एखाद्या ग्रेडचे ५० किलो खत तयार करण्यासाठी आवश्यक सरळ खते यांचे नियोजनही जाहिर करण्यात आले.

आअाशा प्रकारे करता येतील शेतकऱ्यांना गाावाेगावी मिश्र खते ... ५० किलो खत तयार करण्यासाठी लागणारी खतांची मात्रा (किलोमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. खताचे नाव १५:१५:१५ , युरिया १७, सिंगल सुपर फॉस्‌फेट ४७ , एमओपी १३, खताचे नाव १०:२६:२६, युरिया ११, सिंगल सुपर फॉस्‌फेट ८२, एमओपी २२, खताचे नाव १२:३२:१६, युरिया १३, सिंगल सुपर फॉस्‌फेट १०० , एमओपी १.४ , खताचे नाव डीएपी, युरिया २०, सिंगल सुपर फॉस्‌फेट १४४ , एमओपी ०, खताचे नाव २०:२०:०, युरिया २२, सिंगल सुपर फॉस्‌फेट ६३, एमओपी ०, खताचे नाव १९:१९:१९, युरिया २१, सिंगल सुपर फॉस्‌फेट ६०, एमओपी १६, खताचे नाव २४:२४:०, युरिया २६, सिंगल सुपर फॉस्‌फेट ७५, एमओपी ०, खताचे नाव १४:३५:१४, युरिया १६, सिंगल सुपर फॉस्‌फेट ११०, एमओपी १२, खताचे नाव १८:१८:१०, युरिया १२, सिंगल सुपर फॉस्‌फेट ५६, एमओपी ९

बातम्या आणखी आहेत...