आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:धावपटू अविनाश साबळेंच्या पालकांचा कडा येथे सन्मान

कडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत स्टिपल चेस क्रीडा प्रकारात ३० वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे यांच्या पालकांचा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने विशेष सत्कार केला.

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी आणि अमोलक जैन शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी अविनाश साबळे याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच नुकताच अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनो येथे झालेल्या साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेने इतिहास घडवला. अविनाशने ५ हजार मीटर शर्यतीत ३० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आणि नवा राष्ट्रीय विक्रम केला. याबद्दल बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...