आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा:बीडजवळ वेश्या व्यवसायावर ग्रामीण पोलिसांकडून छापा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहराजवळ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायावर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. यावेळी चार पिडीतांची सुटका करण्यात आली तर, दोन जणांविराेधात गुन्हा नोंद करण्यात आला.

बीड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत बीड शहराजवळील चऱ्हाटा फाटा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये राज्य, परराज्यातील महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाली होती. मंगळवारी रात्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.

यावेळी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे दिसून आले. चार पिडीतांची पोलिसांनी सुटका केली. तर, दोन जणांना अट केले. सुरज नवनाथ भाेसले आणि मारोती उर्फ विशाल रघुनाथ मिटकर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात पीएसआय पवन राजपूत यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...