आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार:सचिन धस 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा कर्णधार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाची घोषणा झाली असून राज्य संघाच्या कर्णधारपदी बीडच्या सचिन धसची निवड झाली आहे. महाराष्ट्राचा एलिट ब गटात समावेश आहे.

एलिट ब गटात महाराष्ट्रासह सौराष्ट्र पोंडीचेरी हैदराबाद आसाम व सिक्कीम या संघाचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना राजकोट येथे सौराष्ट्र संघाविरुद्ध ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाणार आहे. दुसरा सामना १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पॉंडिचेरी संघाबरोबर पोंडीचेरी येथे तिसरा सामना हैदराबाद बरोबर १९ ते २२ नाेव्हेंबर दरम्यान पुण्यातील गहुंजे येथील एम सीएच्या मैदानावर चौथा सामना आसाम संघाबरोबर २६ ते २९ नाेव्हेंबर दरम्यान नागोठणे येथील रिलायन्स मैदानावर तर अखेरचा पाचवा साखळी सामना सिक्कीम संघाबरोबर ३ ते ६ डिसेंबर दरम्यान सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे.

सचिन धसची महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड ही बीडसाठी सुखद गोष्ट आहे. बीडकरांच्या आशा सचिनच्या खेळा मुळे खूप वाढल्या आहेत. सचिन लवकरच भारतीय संघात स्थान पटकावेल.अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांनी सचिनचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...