आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ यांची टीका:चंद्र आपला मुखडा दाखवतो तसे मुख्यमंत्री आज मुखडा जनतेला दाखवणार; सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

बीड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या अडीच वर्षानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री मास्क काढून, आपला चेहरा दाखवणार आहेत. मुख्यमंत्री आज सभा घेऊन मास्क काढून, जसा चंद्र आपला मुखडा दाखवतो, तसा आपला मुखडा जनतेला दाखवणार आहेत. लोककल्याणकारी राज्य त्यांना निर्माण करता आले नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

ऊस तोडणी न मिळत असल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव तालुक्यातील नामदेव जाधव या शेतकऱ्यांने 11 मे रोजी शेतातील दोन एकर ऊस जाळून स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांनी आता इंडियाच्या बाहेर येऊन भारतात यावे आणि जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. सध्या जे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याला फक्त सरकार जबाबदार असल्याचे सदाभाऊ म्हणाले.

नामदेव जाधव यांची आत्महत्या नसून सरकार व व्यवस्थेने केलेला खूण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा. अशी मागणी देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. महाराष्ट्रातील अतिरिक्त उसासंदर्भात सर्व माहिती असतानाही, सरकारने व प्रशासनाने यासंदर्भात उपाययोजना केली नाही. म्हणून शेवटी फड पेटवून देऊन नामदेव जाधव या शेतकऱ्याला स्वतःला संपून घ्यावे लागले. यावरून आता ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे, असेही सदाभाऊ म्हणाले.

नामदेव जाधव या शेतकऱ्याकडे खाजगी सावकारी कर्ज होते. त्याचबरोबर वडिलांचे आजारपण आणि स्वतःचा देखील आजारपणा यामुळे झालेला खर्च सावकाराने लावलेल्या तगादा, त्यामुळे शेतकऱ्यांने हे पाऊल उचलले आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे, असा आरोप करत सदाभाऊंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...