आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:संत हे समाजाचे सुरक्षा कवच, ते सुरक्षित ठेवण्याचे काम करतात; नेकनूर येथे तुकाराम महाराज जेऊरकर यांचे प्रतिपादन

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत हे समाजाचे सुरक्षाकवच असतात. अनेक संकटामधून सामान्य जीवाला सुरक्षित ठेवण्याचं मार्गदर्शन करतात. संतांच्या सान्निध्यात पापाची निवृत्ती होते म्हणून बंकटस्वामी सारखे संत हे चालते बोलते तीर्थ असते, असे प्रतिपादन वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांनी केले.

श्रीक्षेत्र नेकनूर येथे सुरू असलेला बंकटस्वामी महाराज यांच्या ७८ व्या पुण्यतिथी उत्सवात दुसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते यावेळी लक्ष्मण महाराज मेंगडे, शाम महाराज पवार, श नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, वसंत महाराज शिंदे, रंजीत महाराज शिंदे, दिनेश महाराज काळे यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. महान संत बंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र नेकनूर येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दुसऱ्या दिवसाचे किर्तन पुष्प गुंफताना तुकाराम महाराज जेऊरकर यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ‘सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा’ या अभंगावर चिंतन केले.

तुकाराम महाराज जेऊरकर म्हणाले, संत हे सामान्य जीवाला सावध करतात. बंकट स्वामी महाराजांनी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात सामान्य लोकांनी येऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा यासाठी मोठे प्रयत्न केले. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य वारकरी संप्रदाय साठी खूप महत्त्वाचे आहे. सावध होऊन हरीचा भजनाला लागण्याचा साधा सोपा मार्ग त्यांनी लोकांना लोकांच्या भाषेत समजून सांगितला. वैष्णवाचा सानिध्यात गेल्यानंतर पाप ताप आणि दैन्य निघून जाते.. संत हे कृपादान करतात ते कदापिही संपत नाही तसेच त्यांच्या आशीर्वादातून जड जीवाची कल्याण होते असे देखील तुकाराम महाराज जेऊरकर यांनी सांगितले. यावेळी कीर्तनासाठी साथ-संगत बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व गायक वादक कार्यकारी मंडळ यांचे लावली.

बातम्या आणखी आहेत...