आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपलेल्या जीवाला जागृत करण्यासाठी संत हे मृत्यू लोकात येतात. संसारात दंग राहून जीवन जगणे म्हणजे एक प्रकारची झोपच आहे. स्वत:ला विसरणे, कर्तव्याला विसरणे ही एक प्रकारची झोपच आहे. जे खोटे आहे त्यालाच आपण खरं मानतो आणि जे खरं आहे त्याला खोटं आहे, असे म्हणणे ही एक प्रकारची झोपच आहे. संतांची संगत आपल्याला जागृत करत असते, असे प्रतिपादन रामकृष्ण रंधवे महाराज यांनी केले. आष्टी शहरातील माऊली मंदिर आवारात संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित संगीत ज्ञानेश्वरी भावकथा, अखंड हरिनाम सप्ताहात ते कीर्तनप्रसंगी बोलत होते. यावेळी अनंत हंबर्डे, बलभीम सुंबरे,डाॕॅ.भास्कर राऊत, डॉ.सुनिल गदादे, प्रा.दत्ताभाऊ सायकड, प्रा.सुभाष रासकर, निवृत्ती महाराज बोडखे, श्रीहरी पुरी महाराज, बाबासाहेब शिंदे, हनुमान येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. रंधवे महाराज म्हणाले की, अज्ञानाच्या झोपेतुन जागविण्यासाठी संत येतात.संत हे उदार असतात. संतविचार व संत कार्याचा विचार जिकडे वाराही जात नाही तेथेही जातो. आपले मरण व भगवंताचे स्मरण या दोन गोष्टी विसरु नका. आपोआप जीवन सुकर व चांगले जीवन जगता येईल.आपल्या सामर्थ्याची, आत्मशक्तीची ओळख संत करुन देतात. चिंतेतुन मुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य उपयोगी ठरते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांची मोठी हजेरी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.