आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेतील कॉपी प्रकरण ::साक्षाळपिंप्रीच्या ‘त्या’ उत्तरपत्रिकांची पडताळणी होणार

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बोर्डाची माहिती : उत्तरांच्या झेरॉक्स प्रतीची २० रुपयांना केली जायची विक्री

तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींची विक्री परीक्षा केंद्रावर केल्याची बाब समोर आली हाेती. याबाबत बोर्डाला अहवाल पाठवण्यात आला आहे. साक्षाळपिंप्री केंद्रावरील उत्तरपत्रिकांची आता बोर्ड पडताळणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शनिवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. साक्षाळपिंप्री येथील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेतील दोन प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींची विक्री होत असल्याचा प्रकार सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत शिक्षण विभागाला माहिती दिली होती. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्राला भेट देत ही माहिती बोर्डाला कळवली होती. मंडळाने या बाबीची गंभीर दखल घेतली असून जप्त साहित्य आल्यानंतर आता त्याची सत्यता पडताळली जाणार आहे. जप्त झेरॉक्स प्रती या पेपरशी संबंधित होत्या का, प्रश्नांची उत्तरे आहेत की उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरांची झेरॉक्स आहे यासह इतर बाबींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती विभागीय परीक्षा मंडळाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...