आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख:उपेक्षित कलावंतांना साळुंके यांनी ओळख दिली : पैठणे

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सतीश साळुंके यांनी मराठवाड्याच्या नाट्यसृष्टीला मराठी रंगभूमीवर मांडून वैभव निर्माण करून दिले. मोठी परंपरा असलेली मराठवाड्याची नाट्यपरंपरा दुर्लक्षित झालेली असतानाच आपल्या‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’या बृहदग्रंथातून त्यांनी मराठवाड्यातील हजारो उपेक्षित कलावंतांना इतिहास दिला असे प्रतिपादन मसाप बीड शाखेचे कार्यवाह पैठणे यांनी केले. साळुंके यांच्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’या ग्रंथाला मसापचा प्रा.कुमार देशमुख नाट्य पुरस्कार मिळाल्याबद्दल बीड शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रा. पैठणे बोलत होते. यावेळी मंगेश रोटे, अण्णासाहेब गडदे, अशोक घोलप हे उपस्थित होते. प्रा.पैठणे पुढे म्हणाले की, डॉ. साळुंके हे स्वतः कलावंत, नाटककार व दिग्दर्शक असल्याने व त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास असल्याने ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ हा ग्रंथ मौलिक व मौल्यवान ठरला असून येत्या कित्येक दशकांपर्यंत रंगभूमीच्या अभ्यासकांना तो मार्गदर्शक ठरेल. यावेळी साळुंके यांनी आपल्या भाषणात बीड शाखेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी मंगेश रोटे यांनी आभार प्रदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...