आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाथाडी नेते तथा मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची ८९ वी जयंती राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. राजकिशोर मोदी यांच्या समवेत अॅड.विष्णुपंत सोळंके, मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण, महादेव आदमाणे, सुनील वाघाळकर, शेख खलील यांनी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. कै.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरातील अण्णासाहेब पाटील चौकातील हा कार्यक्रम पार पडला. यासह चौक नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी राजकिशोर मोदी यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. पाटील यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य झिजविले. त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी वेळोवेळी शासनस्तरावर देखील लढा उभारून माथाडी कामगारांना न्याय पदरी पाडून दिल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील अण्णासाहेब पाटील यांनी सर्वांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गोविंद पोतंगले, धम्मा सरवदे, प्रकाश लखेरा,अशोक देवकर, गणेश मसने,अकबर पठाण ,सय्यद ताहेर, खलील जाफरी, आकाश कऱ्हाड, वाजेद खतीब, काझी शाकेर आदी हजर होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.