आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमा पूजन:कन्हैया आध्यात्मिक वारकरी संस्थेत भगवानबाबांना वंदन ; हरिपाठ घेऊन जयंती साजरी

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा ही संतांची भूमी आहे असे ओळखले जाते. या मराठवाड्याच्या कुशीत अनेक महान संतांनी जन्म घेतला त्यापैकीच राष्ट्रसंत आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवानबाबा हे एक. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून परळी येथील शंकर-पार्वती नगर येथील कन्हैया अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत भगवान बाबा यांची जयंती तेथील वारकरी धर्माचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना हरिपाठ आणि अल्पोपहार देऊन साजरी करण्यात आली.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि आरती गात अभिवादन करण्यात आले. हरिपाठ ग्रंथ हा जीवनाला दिशा देणारा आकाराने छोटासा असणारा परंतु महान असा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी दिला त्यातील एक अभंगाचे अनुसरण मनुष्याने केल्यास त्याला मोक्ष प्राप्त होतो असा ग्रंथ असुन अनाथांची सेवा करणे हा मूलमंत्र संत भगवान बाबांनी आपल्या सर्वांना दिला आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ॲड.मनोज संकाये यांनी केले. यावेळी कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे, उपाध्यक्ष वृक्षराज महाराज आंधळे, मकरंद नरवणे, शिवा बडे, काशिनाथ सरवदे, बालू गुट्टे, राहुल काळे, रमेश संकाये, संतोष कांबळे, सुंदर आव्हाड, प्रवीण रोडे, परमेश्वर मुंडे, चव्हाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...