आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद शिवसेनेच्या ताब्यात द्या. मुख्यमंत्री आपला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आपली आली तर विकास समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवता येईल. मराठवाड्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी संभाजीनगर येथील सभा ऐतिहासिक ठरावी तसेच त्या सभेचे सक्षीदार व्हावेत, असे प्रतिपादन आष्टी-पाटोदा-शिरूर येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले ते शिरूर कासार येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गडकरी ताई शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरे, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मराठवाड्याच्या माथी बसलेला मागासलेपणाचा कलंक धुऊन काढण्यासाठी ८ जून रोजी होणारी संभाजीनगर येथील सभा होणार आहे. मराठवाड्याच्या अविकसित भागाचा विकास करण्यासाठी रस्ते, पिण्याचे पाणी, सिंचनाची व्यवस्था, गाव तिथे स्मशानभूमी, पाणंद रस्ते इत्यादी आपल्या समस्या मांडण्यासाठी शासनाने भक्कम असे व्यासपीठ निर्माण केले आहे. विरोधकांचा समाचार घेताना बीड जिल्ह्यात टोळधाड ही टोलवसुली करण्यात मशगुल आहे. त्यांना विकासाचे इथल्या समस्यांची काहीही देणे घेणे उरलेले नाही. त्यांना फक्त वसुली पाहिजे आहे. आपल्या विकासाची वसुली करणारी टोळधाड घरी बसवण्यासाठी येत्या काळात शिवसेनेला सढळ हाताने सहकार्य करा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी माजी मंत्री बदामराव पंडित, संपदाताई गडकरी, अनिल जगताप, यांचीही भाषणे झाली या कार्यक्रमास पं.स.सभापती उषाताई सरवदे, किरण चव्हाण, अर्जुन गाडेकर, सुधाकर मिसाळ, सतीश काटे, भारत जाधव, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, संजय सानप, संतोष कंठाळे, शेख बीबण, प्रभाकर सानप, नारायण काजळे, अमोल सानप, अक्षय रणखांब, वसंत काटे, सुधाकर खोले, देवीदास कंठाळे, मिनाताई उगलमुगले, शोभा सरवदे, शेख मैनू भाई, शेख लतीफ, गोकुळ थोरात, सागर केदार, शिवाजी वारे, बाजीराव कोल्हे, विनायक चव्हाण, प्रकाश इंगळे, युवराज सोनवणे, गोविंद गाडेकर, कैलास गायके, त्र्यंबकेश्वर सानप, शेख हबीब यांच्यासह आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.